⁠हॅलो संवाद

मोठी बातमी : जळगाव-पुणे विमानसेवा (Jalgaon Airport) होणार सुरू, २४ आणि २६ मे रोजी ट्रायल

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव ते पुणे या विमानसेवेची अखेर येत्या आठवड्यात ट्रायल फ्लाइट उड्डाण भरणार आहे. विमानसेवा (Jalgaon Airport) पुरवणाऱ्या ‘फ्लाय ९१’ या कंपनीने २४ व २६ मे रोजी या ट्रायल फ्लाइटचे नियोजन केले असून तिकीट विक्री सुरु केली आहे. सात वर्षांपूर्वी जळगावातून – व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात झाली होती. उदघाटनाच्या वेळी जळगावातून पुण्यासाठी विमानसेवा सुरु करण्याबाबत तत्कालिन कंपनीने घोषणा केली होती.

जळगाव विमानतळावरून (Jalgaon Airport) सेवा पुरवणाऱ्या कंपनीने शुक्रवारी या अतिरिक्त व प्रायोगिक तत्वावरील विमानसेवेची अधिकृत घोषणा केली आहे.त्यानुसार जळगावातून २४ व २६ मे रोजी ट्रायल फ्लाइट दाखवल्या आहेत. या दोन्ही दिवशी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी पुण्यासाठी फ्लाइट उड्डाण भरेल ते पुण्यात ३ वाजून २५ मिनिटांनी लैंड होईल. अर्ध्या तासाने ही फ्लाइट परतीसाठी पुण्यातून ३ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण भरून जळगावात ५ वाजून २० मिनिटांनी लँड होईल.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Girish Mahajan : विजया केसरी प्रतिष्ठान तर्फे मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवशी वृक्षारोपण अभियानास प्रारंभ

Jalgaon Shetkari : जळगावातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, एकीकडे पाण्याचा अभाव तर दुसरीकडे चोरट्यांचा धुमाकूळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button