भडगाव नगरपरिषद निवडणूक निकाल, शिवसेनेचा दणदणीत विजय – निकालाचे संपूर्ण विश्लेषण…
हॅलो जनता न्यूज, (यश पाटील)-भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निकालाने शहराच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला असून शिवसेना (शिंदे गट) ने या निवडणुकीत वर्चस्व सिद्ध केले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार रेखाताई प्रदीप मालचे यांनी १२ हजार ९५५ मतांचे आघाडीचे मताधिक्य मिळवत दणदणीत विजय संपादन केला आहे. रेखाताई मालचे यांनी भारतीय जनता…
