शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, आताच ई-पीक पाहणी नोंदणी करा अन्यथा….

हॅलो जनता, जळगाव, दि. ३० जून – उन्हाळी हंगाम २०२४–२५ करिता शेतकऱ्यांनी ‘ई-पीक पाहणी’ मोबाईल अॅपद्वारे करावयाच्या नोंदणीसाठी राज्य शासनाने ७ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यानुसार आता सहायक स्तरावरून पीक नोंदणी करण्याची अंतिम तारीख ६ जुलै २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत भौगोलिक व तांत्रिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांना नोंदणीस अडथळे निर्माण झाले होते. हे लक्षात घेऊन शासनाच्या निर्णयानुसार ही मुदतवाढ देण्यात आली असून, मा. जमाबंदी आयुक्त, पुणे यांच्यामार्फत यास मान्यता देण्यात आली आहे.
ई-पीक पाहणी’ नोंदणी ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, यामुळे शेतकऱ्यांना अचूक पीकदाखला, पीकविमा योजना, अनुदान, तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई मिळविण्यास मदत होते.
शेतकरी ‘ई-पीक पाहणी’ मोबाईल अॅपच्या माध्यमातून घरी बसूनच पीक नोंदणी करू शकतात. या अॅपचा वापर सुलभ असून, आपल्या शेती व पीकविषयक माहितीची अचूक नोंद शासनाच्या प्रणालीत करता येते. शासनाच्या विविध योजना व संरक्षणासाठी ई-पीक नोंदणी महत्त्वाची आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केली नाही, त्यांनी ही संधी वापरून लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या….
रावेर तालुक्यात वादळी वाऱ्याचा कहर : केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
रावेर तालुक्यातील भालोद येथे सामूहिक ऐकण्यात आला “मन की बात” कार्यक्रम
💥ब्रेकिंग : आरोग्य विभागाचे सर्वेक्षणात धक्कादायक बाब उघड, जिल्हयात वर्षभरात ७५८ बालविवाह