भडगावच्या राजकारणात ‘रेखाताईं’चा नवा अध्याय ; हिंद लोक चळवळीच्या वतीने जाहीर सत्कार.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक प्रशासनाचा नगराध्यक्षांचा निर्धार; १५११ मतांनी मिळवला ऐतिहासिक विजय भडगाव (प्रतिनिधी) भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये जनसामान्यांच्या थेट मतदानातून निवडून आलेल्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. रेखाताई प्रदीप मालचे यांचा ‘जय हिंद लोक चळवळ, भडगाव’ च्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला. १५११ मतांच्या दणदणीत विजयाने भडगावच्या राजकारणात महिला नेतृत्वाचे एक नवे पर्व…
