🛑 एसीबीची कारवाई, पाचोऱ्यातील सहाय्यक महसूल अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात अटक
हॅलो जनता न्यूज, पाचोरा :- शासकीय काम करून देण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाच मागून दहा हजारांची लाच स्वीकारताना पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी गणेश लोखंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवार, १० सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ४.१५ वाजता करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार नागरिकाने शासकीय कामासाठी संबंधित कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, ते काम करून देण्यासाठी सहाय्यक महसूल अधिकारी लोखंडे यांनी १५ हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार पडताळणी दरम्यान लोखंडे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला.
एसीबीची कारवाई : १० हजार लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक..
निश्चित केलेल्या ठिकाणी तक्रारदाराकडून लोखंडे यांनी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबी पथकाने त्यांना कार्यालयाबाहेरच अटक केली. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. पुढील तपास सुरू आहे. थोड्याच वेळात सविस्तर वृत्त….
इतर महत्वाच्या बातम्या…
🛑 दुर्मीळ आजारांसाठी शासनाने स्वतंत्र धोरण आखावे, सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांची मागणी
🛑 ब्रेकिंग : पाचोरा भडगाव मतदार संघातील आणखी एक विरोधक भाजपच्या गळाला, आज मुंबई येथे प्रवेश सोहळा….
🌿 वृक्ष लागवड करून प्रकृतीचे रक्षण ही सर्वांची जबाबदारी – महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज




