🚨आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सामान्य ज्ञान स्पर्धा

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त किशोर पाटील बहुउद्देशीय संस्था, पाचोरा आणि द युनिक अकॅडमी शाखा, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत व खुल्या सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.
ही स्पर्धा रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा येथील व्यापारी भवन, कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर पार पडणार आहे. जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी तसेच सर्वसामान्य ज्ञानप्रेमी नागरिकांना यात सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांसाठी आकर्षक रोख बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे.
🏆 बक्षिसे पुढीलप्रमाणे:
- प्रथम क्रमांक – ₹११,०००
- द्वितीय क्रमांक – ₹७,१००
- तृतीय क्रमांक – ₹५,१००
- चतुर्थ क्रमांक – ₹३,१००
- पाचवा क्रमांक – ₹१,१००
स्पर्धेसाठी इच्छुकांनी ऑनलाइन नोंदणीसाठी खालील लिंकचा वापर करावा 👇
https://forms.gle/V9iZm4MJ8mNSqMq97
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक ८९२९७२८४१८ उपलब्ध आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी पॅड, पेन आणि कोरे पृष्ठ सोबत आणणे आवश्यक आहे, अशी सूचना आयोजकांनी केली आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना, सामान्य ज्ञानाची आवड आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करणे हे असल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यांनी अधिकाधिक विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेऊन आपली बौद्धिक क्षमता आजमवावी, असे आवाहन केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या….
🔴 ब्रेकिंग : गिरणा धरण, सतर्कतेचा इशारा : पाण्याचा विसर्ग वाढविला…




