“या” ताखेपासून भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला होणार सुरुवात, राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती..
हॅलो जनता न्यूज, जळगाव : किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम २०२५–२६ साठी जिल्ह्यात भरडधान्य खरेदी प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळावा आणि खरेदी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया उद्यापासून सुरू करण्यात आल्याची माहिती राज्य पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम यांनी दिली…
