आंचळगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी : प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरखेड अंतर्गत आंचळगाव येथे आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरखेडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरखेडच्या वतीने स्वतंत्र आरोग्य पथक तयार करण्यात आले होते. शिबिरात गावातील नागरिकांची…
