जामनेर दगडफेक प्रकरण : ३०० पेक्षा जास्त संशयितांवर गुन्हे दाखल तर १५ संशयितांना अटक

हॅलो जनता प्रतिनिधी – जामनेर तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांची विविध पथके तयार करत काल भुसावळ येथून आरोपीला अटक करण्यात आली होती. मात्र जामनेर पोलीस स्थानकासमोर मोठा जमाव जमा झाला असून त्यांनी आरोपीला जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी केली.
त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने जमावाने जामनेर पोलीस स्थानकावर दगडफेक केली. या दगडफेकीत तब्बल १५ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यापैकी ६ पोलीस कर्मचारी अजूनही खाजगी रुग्णालयात दाखल झालेले आहे. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. दगडफेक प्रकरणात आतापर्यंत १५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून व्हिडिओ फुटेज तपासून ३०० पेक्षा अधिक संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून लवकरच काही आरोपी ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.
बालिकेवर अत्याचार व खून करणाऱ्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी
जामनेर बालिका अत्याचार प्रकरणातील आरोपीला आज पोलिसांनी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांचा तपास हा जलद गतीने सुरू असून या आरोपीला खटोड शिक्षा व्हावी यासाठी वस्तुनिष्ठ पुरावे जमा करण्याचे काम सुरू असून जनतेने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत कायदा हातात न घेता कोणत्याही प्रकारच्या अफेवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरी रेड्डी यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या..
जामनेर शहरात तणावपूर्ण शांतता, एस आर पी एफच्या पथकासह मोठा पोलिस बंदोबस्त
क्रिकेट विश्वावर शोककळा, टीम इंडियाच्या माजी क्रिकेपटूने चौथ्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या…
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. सदानंद भिसे यांची नियुक्ती