Dharangaon : धरणगाव शहरात पाणी टंचाई, ठाकरेंच्या सेनेचे नगरपालिका प्रशासनसमोर ठिय्या आंदोलन
हॅलो जनता (जळगाव) – धरणगाव (Dharangaon) शहरात सध्या भीषण पाणी टंचाई सुरू असून यासाठी कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करून नागरिकांना नियमीत शुध्द पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी ठाकरेंच्या सेनेतर्फे धरणगाव नगरपालिकेत ठिय्या आंदोलन करण्यात आले. धरणगाव शहरामध्ये पाणी टंचाई असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
या अनुषंगाने आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्यांनी नगरपालिका नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत धरणगाव नगरपालिकेत ठिय्या आंदोलन केले. यावेळी नियमित शुद्ध पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली असून येत्या आठ दिवसांत मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
Dharangaon : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदरसंघात पाणी टंचाई….
धरणगाव (Dharangaon) शहरातील जैन गल्ली येथे नवीन पाईप बसवून पाणी पुरवठा करण्यात आला होता. यात थेट व्हाईट हाऊस पासून ते जैन गल्लीपर्यंत आणि परिसरात ज्यांनी नळ घेतलेले आहेत त्यांना व्यवस्थित पाणी येत नव्हते. ज्यांना थोडेफार पाणी आले ते देखील व्कमी दाबाने आले. याकडे नगरपालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. ज्या भागात नवीन नळ कनेक्शन घेण्यात आले आहे, त्या भागात पाणी पुरवठ्याच्या दिवशी ठेकेदाराचे कर्मचारी नसतात. यासोबत, शहरात करण्यात येणारा पाणी पुरवठा हा फिल्टर न करता करण्यात येत असल्यामुळे शहरात डेंग्यू, ताप आदी साथीचे आजार पसरलेले आहेत. शहरात होणारा पाणी पुरवठा हा अशुध्द प्रकारातील असून याकडे लक्ष देऊन शुध्द पाणी पुरवठा आणि तो देखील सुरळीतपणे करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
Bhusawal Gangwar : भुसावळ शहर गँगवार ने हादरले, गोळीबारात दोघांचा मृत्यू
Mount Everest : या ठरल्या माऊंट एवरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी