Mayuri Suicide Case | लग्नाला चार महिने अन् जळगावात विवाहितेची आत्महत्या, हुंडाबळीचा आरोप

हॅलो जनता न्यूज, जळगाव – शहरातील सुंदर मोती नगर परिसरात अवघ्या चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या 23 वर्षीय मयुरी ठोसरे (Mayuri Suicide Case) हिने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, पुन्हा एकदा हुंड्याच्या छळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
Mayuri Suicide Case : लग्नानंतर वाढला छळ
मयुरीचा विवाह 10 मे रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. परंतु, लग्नाला अवघे चार महिने होत नाही तोच तिच्यावर सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी मानसिक छळ सुरू झाला, असा आरोप माहेरकडील नातेवाईकांनी केला आहे. यापूर्वी तीन वेळा माहेर-सासरच्या मंडळींच्या उपस्थितीत तडजोडी झाल्या होत्या. मात्र, छळ थांबला नाही.(Mayuri Suicide Case)
Mayuri Suicide Case : वाढदिवसानंतरच घेतला टोकाचा निर्णय
मयुरीचा वाढदिवस 9 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला होता. माहेरकडून पैसे देऊन वाढदिवसाचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर अवघ्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 सप्टेंबर रोजी घरात कोणी नसताना मयुरीने (Mayuri Suicide Case) गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले.

Mayuri Suicide Case : गंभीर आरोप – दीराचे वर्तनही अश्लील
मयुरीच्या भावाने गंभीर आरोप करत सांगितले की, “माझ्या बहिणीचा मोठा दीर गणेश ठोसर याचा घटस्फोट झालेला असून, तो माझ्या बहिणीसोबत वारंवार अश्लील वर्तन करत होता. बहिणीने मला फोनवर याची माहिती दिली होती, मात्र मी दुर्लक्ष केले. त्याचे वर्तन अधिकच बिघडत गेले.”
Mayuri Suicide Case : पोलिसांवरही दुर्लक्षाचा आरोप
घटनेनंतर मयुरीचा मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी माहेरकडील मंडळींनी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी तक्रार स्वीकारली नाही, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. परिणामी, सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा निर्धार माहेरकडील मंडळींनी केला आहे.
Mayuri Suicide Case : आरोपींवर कारवाईची मागणी
मयुरीच्या (Mayuri Suicide Case) आई-वडिलांसह भावाने पती गौरव ठोसर, दीर गणेश ठोसर, सासू लता ठोसर, किशोर ठोसर आणि ननंद यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर महाराष्ट्र हादरून गेला होता. समाजात सुधारणा होईल, अशा अपेक्षा व्यक्त झाल्या होत्या. मात्र, जळगावातील मयुरी ठोसरे प्रकरणाने पुन्हा एकदा हुंडाबळीचे भयावह वास्तव समोर आणले आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि हुंडाबळीविरोधातील कायद्याची अंमलबजावणी याबाबत प्रशासनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
🛑 राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर…
🛑स्थानिक गुन्हे शाखा : बोकड व बकरी चोरी प्रकरणातील तिघे आरोपी जेरबंद
🛑 Central Railway : मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी महत्वाची घोषणा, दिवाळी आणि छठसाठी…