Mahayuti sarkar : महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला, कोणत्या पक्षाला मिळणार किती मंत्रिपदे…
हॅलो जनता प्रतिनिधी, मुंबई –
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला (Mahayuti Sarkar) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. महायुतीने 235 जागांवर विजय मिळवला. यामध्ये भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यासोबत महाविकास आघाडीला अवघ्या 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या आहेत.
यावरून आता राज्यात महायुतीची (Mahayuti Sarkar) सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे. अशातच सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असताना महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या वाटपासाठी फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. 6 ते 7 आमदारांच्या मागे एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपचे 132 आमदार विजयी झाले आहेत.
त्यामुळे भाजपच्या वाट्याला 22 ते 24 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे शिवसेनेला 10 ते 12 मंत्रिपदं आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत त्यामुळे त्यांना 8 ते 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र महायुतीचे (Mahayuti Sarkar) तिनही प्रमुख नेते यावर अंतिम निर्णय घेणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या…
Anil Patil : मंत्री अनिल पाटलांनी विजयानंतर घेतले श्री मंगळ ग्रह देवेतचे दर्शन
ब्रेकिंग : निकालानंतर 24 तासांत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, “इतके” आमदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात…