हॅलो राजकारण

Kulbhushan Patil : कुलभुषण पाटील यांनी मातोश्रीवर घेतली उध्दव ठाकरेंची भेट

उध्दव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने कुलभूषण पाटील वाटणार १० हजार छत्री व टीशर्ट

हॅलो जनता : जळगाव  उबाठा गटाचे उपमहापौर कुलभुषण पाटील (Kulbhushan Patil) यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) छत्री व टी शर्टचे आज शिवसेना नेते तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर अनावरण करण्यात आले. पक्षाचे मशाल हे चिन्ह घराघरात पोहचविण्यासाठी याचा फायदा होईल, असा विश्वास उध्दव ठाकरे यांनी व्यक्त करत कुलभुषण पाटील यांच्या या उपक्रमाचे कौतूक केले. यावेळी त्यांनी जळगाव शहरात काम करत रहा, अशा सुचना देत राजकीय वाटचालीसाठी आर्शिवाद दिले.

उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने उबाठा गटाचे माजी उपमहापौर कुलभुषण पाटील (Kulbhushan Patil) यांच्या तर्फे जळगाव शहरात १० हजार छत्री व टी शर्टचे वाटप करण्यात येणार आहे. या छत्री व टी शर्टचे आज उध्दव ठाकरे यांनी कौतूक केले. छत्री व टी शर्टवर बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे, अदित्य ठाकरे व कुलभुषण पाटील यांचा फोटो व मशालीचे चिन्ह आहे. या माध्यतातून पक्षाचे नाव व चिन्ह घराघरात पोहचिण्यास मदत होईल. यावेळी बाळासाहेबांची २० टक्के राजकारण ८० टक्के समाजकारण ही शिकवण लक्षात ठेवून सामाजिक काम करत रहा. नागरिकांच्या मनात मशालच आहे, याची प्रचिती लोकसभा निवडणुकीत आलीच आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत यश आपलेच आहे, अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी कुलभुषण पाटील यांचे कौतूक केले. यावेळी सुनिल ठाकूर उपस्थित होते.

कुलभूषण पाटील (Kulbhushan Patil) हे जळगाव शहरातील शिवसेनेचा तरुण आक्रमक चेहरा असून विद्यार्थी सेनेपासून शिवसेनेचे काम करत आहेत. उपमहापौर असतांना केलेल्या कामामुळे त्यांची शहरात चांगली ओळख निर्माण झाली आहे. पिंप्राळा उपनगरात त्यांनी रस्ते व इतर मूलभूत सुविधांचे जाळे विणले आहे. पिंप्राळातील त्यांनी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्यावेळी देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले होते. यामुळे आगामी विधानसभेनिमित्त त्यांचे पारडे जड असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शिक्षण सप्ताहात क्रीडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी खेळले स्वदेशी खेळ

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांना होणार अटक, काय आहे नेमके प्रकरण…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button