पत्रकार जुगल पाटील यांनी वाचविले आत्मदहन करणाऱ्या महिलेचे प्राण, सर्व स्तरावरून कौतुक
हॅलो जनता (जळगाव) – तहसीलदारांनी अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले असताना ग्रा.पं. कडून कारवाई होत नसल्याने भडगाव तालुक्यातील कजगाव येथील एका महिलेने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी बातमी कव्हर करण्यासाठी आलेले पत्रकार जुगल पाटील यांनी वेळीच महिलेच्या हातातून आगपेटी हुसकावून बाजूला फेकाल्याने अनर्थ टळला आहे.
कजगाव ग्रामपंचायत अंतर्गत शासकीय गट क्र. १३१/२ बस स्थानकाच्या हद्दीमधील आवारात मोठ्या प्रमाणावर पक्क्या स्वरूपात बांधकाम करीत अतिक्रमण झाल्याचा आरोप आहे.अतिक्रमण काढून बस स्थानकाची जागा मोकळी करावी, यासाठी उषाबाई नामदेव पाटील यांनी तक्रार अर्ज दिला होता. त्यावर भडगावचे तहसीलदार विजय बनसोडे यांनी अतिक्रमण काढण्याचे आदेश कजगाव ग्रामपंचायतीला दिले. मात्र, ग्रा.पं.ने उत्पनाचे स्रोत दाखवून अतिक्रमण काढण्यासाठी टाळाटाळ केली.
त्यानंतर उषाबाईंनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करत असताना पत्रकार जुगल पाटील यांनी प्रसंगावधान दाखवत अंगावर पेट्रोल टाकलेल्या महिलेच्या हातातून आगपेटी हिसकवत दूर फेकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. जुगल पाटील यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Loksabha Election : विदर्भातील पाच मतदारसंघांत मतदानाला सुरवात, सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह…