⁠हॅलो संवाद

Jalgaon Loksabha : ‘दिलखुलास’मध्ये जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची

‘लोकसभा निवडणुकांची तयारी’ विषयावर मुलाखत

मुंबई :  ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४’ (Jalgaon Loksabha) जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी जळगावचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमासाठी मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत बुधवार दि. ८ मे २०२४ रोजी आणि गुरुवार ९ मे २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

जळगाव जिल्ह्यात असलेले लोकसभा निवडणूक मतदार संघ, लोकसभा निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन, सर्व घटकातील मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधा याबाबत श्री. आयुष प्रसाद यांनी माहिती दिली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon Loksabha : “भाजपवाले मदत करो नको करो आम्ही मदत करणार” पालकमंत्र्यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजन म्हणाले….

Devendra Fadanvis : उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, भुसावळ मध्ये जाहीर सभेचे आयोजन

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button