अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदी या अधिकाऱ्याची वर्णी…

हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी कुणाची नियुक्ती होणार यासंदर्भात अनेक दिवसांपासून विविध चर्चांना उधाण आले होते या नियुक्तीला उशीर होत असल्याने यात राजकीय हस्तक्षेप असल्याचे देखील चर्चा रंगली होती मात्र अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पदी जळगाव येथील एमआयडीसी पोलीस स्थानकाचे विद्यमान पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांची नियुक्ती झाली आहे.
ही नियुक्ती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या आदेशान्वये आज झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी हॅलो जनता वृत्तवाहिनीला दिली आहे. उद्या गुरुवारी, १३ जून रोजी बबन आव्हाड हे आपला पदभार स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या..
जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी केली नुकसानग्रस्त शेताची पाहणी
बैल वाचवले पण शेतकरी मेला, रेल्वे अंडरपास मध्ये साचलेल्या पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू