⁠हॅलो संवाद

Jalgaon Company Fire : केमिकल कंपनीच्या आगीत 20 जण जखमी तर 1 कामगाराचा मृत्यू

हॅलो जनता | एमआयडीसीमधील डी-सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीला भीषण आग (Jalgaon Company Fire) लागल्याची घटना घडली असून या आगीत 20 कामगार जखमी झलाई असून काही कर्मचारी गंभीररित्या भाजले गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. यामधील काही जखमींना खाजगी तर काहींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यात समाधान पाटील या एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांनी घेतली जखमी कर्मचाऱ्यांची भेट

या घटनेची माहिती मिळताच जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली तर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात जाऊन जखमी कामगारांची तब्येतीची विचारपूस केली. या घटनेत जखमींवर उपचार सुरू असून त्यांना मुंबईत हलवावे लागले तरी व्यवस्था करावी अशी सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित विभागाला दिली आहे. तसेच या सर्व जखमींचा मोफत इलाज केला जाईल आणि हा सर्व खर्च शासनाकडून केला जाणार असल्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

जळगाव एम.आय.डी.सी सेक्टर ‘डी ‘ मध्ये केमिकल कंपनी मध्ये आग लागली असून आग विझविण्यासाठी अग्निशमन यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे तीन रुग्णवाहिका घटनास्थळी झाल्या असून रुग्णालयांनाही सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती वर लक्ष ठेवून आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

MVA Jalgaon : पाचोऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी, आजच्या बैठकीला काँग्रेस अनूपस्थित

ST Ticket Rates Increase : एसटीचे तिकीट दर १० टक्क्यांनी वाढणार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button