रशियात मृत्यू झालेल्या तिन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह परिवाराला सुपूर्द, जड अंतःकरणाने परिवाराने केले अंत्यसंस्कार

हॅलो जनता प्रतिनिधी – रशिया येथे नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह शासकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर काल मुंबई विमानतळावर पाचोरा व अमळनेर प्रांताधिकाऱ्यांनी ताब्यात घेत रात्री त्यांच्या परिवाराला सुपूर्द केले आहेत. रशिया येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या जिया फिरोज पिंजारी, जिशान अशफाक पिंजारी यांच्यावर अमळनेर येथे तर हर्षल अनंतराव देसले याच्यावर भडगाव तालुक्यातील वाक् या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
या विद्यार्थ्यांचा ४ जून रोजी रशियातील वोल्खोव्ह नदीत बुडून मृत्यू झाला होता.या विद्यार्थ्यांचे शव मुंबई विमानतळावरून शासकीय प्रचलित प्रक्रियेनुसार ताब्यात घेऊन नातेवाइकांकडे सोपविण्यात आले असून त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संखेने गावातील नागरिक जमले असून सर्व स्तरावरून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. आज अमळनेर येथे मंत्री अनिल पाटील यांनी मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची भेट घेत त्यांना सातवणा दिली असून जिल्ह्यातील तिन्ही विद्यार्थ्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो अशी प्रतिक्रिया दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या…
जामनेर बालिका अत्याचार आणि खून प्रकरणतील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 10 पथके रवाना
अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदी या अधिकाऱ्याची वर्णी…