हॅलो राजकारण

Erndol Assembly : एरंडोल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटासह ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका..

जळगाव प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विधानसभा (Erndol Assembly) मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा फटका बसला आहे.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विधानसभा (Erndol Assembly) मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांनी आमदार चिमणराव पाटील यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून सर्वांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिला.

शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या मध्ये शरद पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष मनोज पाटील, माजी शहराध्यक्ष बबलू चौधरी, अमोल तांबोळी, भानुदास वारके, आरिफ मिस्त्री, उबाठा गटाचे बाळा कलवंत, दिलीप चौधरी, अनिल भोई, विलास भोई, नरेश सोनावणे आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.

राज्यातील महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारे सरकार आहे. मी देखील आज मुख्यमंत्री असलो तरीही तुमच्यातलाच एक आहे. त्यामुळे पक्षाला सर्वसामान्य माणसाशी जोडून पक्षाच्या वाढीसाठी काम करावे अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, (Erndol Assembly) आमदार चिमणराव पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या

उमेदवार जोमात अन् कार्यकर्ते कोमात, प्रचार सुरू न झाल्याने कार्यकर्त्यांचा हात तंग

Avkali paus : राज्यातील सर्वाधिक पीक नुकसान हे जळगाव जिल्ह्यात, जाणून घ्या नुकसानीची आकडेवारी

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button