⁠हॅलो क्राईम

🛑 ब्रेकिंग : हॉटेल मध्ये अचानक स्फोट अन् चहा पिणारे गंभीर जखमी, नेमके काय घडले….

हॅलो जनता न्यूज, भडगाव – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज दुपारी भीषण स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. परिसरातील मिलन हॉटेलमधील डी.फ्रिजचा स्फोट इतका जबरदस्त होता की संपूर्ण हॉटेल हादरले, तर शेजारील दुकाने व नागरिक घाबरून रस्त्यावर धावले.

भडगाव स्फोट : तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले

या स्फोटात हॉटेल चालकाचा मुलगा सोहिल मणियार, भडगाव शहरातील रवी सोनवणे तसेच पुण्यातून आलेले पाच ग्राहक गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटानंतर हॉटेलमध्ये आगीचा भडका उडाल्याने धुराचे लोट उठले आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. नागरिकांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढत मदतकार्य सुरू केले. जखमींना प्रथम भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सर्वांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी पाचोरा येथे हलविण्यात आले आहे.

भडगाव स्फोट : आमदार किशोर पाटील तातडीने घटनास्थळी दाखल…

अपघाताची माहिती मिळताच आमदार किशोर पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली. त्यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज जाधव यांना आवश्यक त्या सूचना देत रुग्णांना तातडीने व योग्य उपचार मिळावेत यावर भर दिला. तसेच त्यांनी जखमींच्या नातेवाईकांना धीर देत मदतकार्य समन्वयित केले.

भडगाव sfot
भडगाव स्फोट

जखमींच्या नातेवाईक, मित्रपरिवार व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले असून बचावकार्याला गती मिळाली आहे. स्फोटानंतरची भीषण परिस्थिती पाहता नागरिकांनी आपापल्या परीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, जखमींना उचलून रुग्णालयात पोहोचवणे अशी मदत केली. या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे. स्फोट डी.फ्रिजच्या गॅस सिलेंडरमधील गळतीमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🛑 त्रास देणाऱ्यांना पक्षात घ्या, मंत्री गिरीश महाजनांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला…

🛑 बनावट आदेश अन् तहसील कार्यालयात लाखोंची फसवणूक, सहाय्यक महसूल अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

🛑 जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न, चेअरमन रोहित निकम यांच्या कामाचे कौतुक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button