Mahavikas Aaghadi : महाविकास आघाडीत वादाची ठिणगी ! संजय राऊतांचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
हॅलो जनता न्युज, मुंबई :
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकीतील पराभवावर चर्चा करताच महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) वादाची ठिणगी पडली. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत पराभवाचे कारण एकमेकांवर ढकलले. या वादामुळे सत्ताधाऱ्यांना आनंद मिळाल्याचे सांगितले जात आहे. कालपासून महाविकास आघाडीतल्या अडचणी आणि वादावर चर्चा होऊ लागली आहे. आज संजय राऊत यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आणि INDIA आघाडीला एक मोठा इशारा दिला.
विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेच्या जागा वाटपात झालेल्या गोंधळावर बोट ठेवले. ते म्हणाले की, जागा वाटप दोन दिवसांत पूर्ण झालं असतं, तर प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला असता. परंतु विलंबामुळे नियोजनात अडचणी आल्या आणि त्यामुळे आघाडीचे प्रचाराचे नियोजन व्यवस्थित न झाल्याचा आरोप त्यांनी केला. यासाठी त्यांनी नाना पटोले आणि संजय राऊत यांना जबाबदार धरले. यावर आता संजय राऊत यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
Mahavikas Aaghadi : INDIA आघाडी फुटली तर…
संजय राऊत म्हणाले, “लोकसभा निवडणुकीनंतर INDIA आघाडी जिवंत ठेवण्याची जबाबदारी काँग्रेसची होती. त्यांनी बैठक घ्यायला हवी होती, पण एकही बैठक घेतली नाही. काँग्रेसने INDIA आघाडीचं अस्तित्व राखायला हवं होतं, पण संवाद ठेवला नाही.” त्यांनी काँग्रेसला जबाबदारी स्वीकारून अधिकृतपणे जाहीर करण्याचा सल्ला दिला.
राऊत यांनी चेतावणी दिली की, “INDIA आघाडी फुटली तर ती पुन्हा एकत्र येणार नाही. काँग्रेसला हे समजून, त्यांच्या पुढील भूमिकेबाबत विचार करूनच निर्णय घ्यावा.”
Jalgaon ZP : बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार, जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओंचे निर्देश…