💥 ब्रेकिंग : विद्यापीठात उद्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

हॅलो जनता न्यूज, जळगाव – क्रीडा व युवा कल्याण मंत्रालय (भारत सरकार), जिल्हा प्रशासन जळगाव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शुक्रवार दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनाचा कार्यक्रमाचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिता वाघ व अध्यक्ष स्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी असणार आहे.
यावेळी प्र-कुलगुरू प्रा. सोपान इंगळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांची देखील उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम विद्यापीठातील इनडोअर हॉल, क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागातर्फे योगाचे प्रात्यक्षिक केले जाणार आहेत. तरी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील, योग विभागप्रमुख इंजि. राजेश पाटील व जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
💥 ब्रेकिंग : मुक्ताईनगरातील भाविक जम्मूत अडकले, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला फोन अन्..
💥 ब्रेकिंग : सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गोसावी यांना समाज भूषण पुरस्कार




