Headlines

हॅलो जनता न्यूज डेस्क

पाचोरा पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करा, भाजप युवा मोर्चाची मागणी…

हॅलो जनता, प्रतिनिधी – पाचोरा पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत पोलीस स्थानकातून हाकलून लावण्याचा प्रकार घडला असून याची गंभीर दखल घेऊन पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची जळगाव पोलीस मुख्यालय बदली करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे…

Read Full News

रावेरमध्ये धनगर समाज आक्रमक, बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर धनगर बांधवांचे रस्ता रोको

हॅलो जनता, रावेर – राज्यात मराठा ओबीसी समाधानानंतर आता आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असून धनगर समाजाकडून जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात धनगर समाजाच्या नेत्यांसह नागरिक मोठ्या संख्येने महिला, लहान मुले सहभागी झाले होते. महाराष्ट्र आणि मध्य…

Read Full News

मेंढपाळ कुटुंबातील ११ वर्षीय मुलाला सर्पदंश, संदीप सावळे यांच्या तत्काळ मदतीने वाचले प्राण

हॅलो जनता, रावेर – अहीरवाडी शेती शिवारातील एका मेंढपाळ कुटुंबात राहणाऱ्या ११ वर्षीय डिगंबर कोळपे याला साप चावल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच संदीप सावळे यांनी तातडीने मदत करत त्याला रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेच्या वेळी सकाळी दहाच्या सुमारास डिगंबर आपल्या झोपडीत असताना सापाने त्याला चावले. त्यावेळी तेथे उपस्थित वामन कोडके व बाळू कोळपे…

Read Full News

मग समोर कुणालाही येवू द्या, दिलीप खोडपेंच्या भूमिकेवर मंत्री महाजन यांची प्रतिक्रिया

हॅलो जनता, जळगाव – गणपती बाप्पाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्याला काय करायचे हे माहीत आहे. म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचेच सरकार मोठ्या मताधिक्याने येणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव शहरातील गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत म्हटले आहे. भाजपचे ३५ वर्षापासून निष्ठावान समर्थक दिलीप खोडपे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश…

Read Full News

विद्यमान आमदारांनी मतदारसंघ भकास करण्याचे पाप केले आहे, सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांची टीका…

हॅलो जनता, प्रतिनिधी – केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांची मोठी उपेक्षा केली असून त्यांच्या प्रश्नांवर विचार करण्यासाठी कुणालाही वेळ नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. सरकार फक्त प्रचारात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. अशी टीका शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी केली आहे. पाचोरा भडगाव मतदारसंघातील जारगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या….

Read Full News

बिबट्याच्या हल्ल्यात मयत रिंकेश मोरे च्या कुटुंबियांना आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते १० लाखांची मदत…

हॅलो जनता, चाळीसगाव – गणेशपूर येथील रिंकेश नंदू मोरे या १३ वर्षीय तरुणाचा बिबट्याचा हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची दखल घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या तसेच मयताच्या कुटुंबियांना तात्काळ अर्थसहाय्य देण्याच्या सूचना वनविभागाला दिल्या होत्या. त्यानुसार मयत रिंकेश मोरे च्या कायदेशीर वारसांना एकूण २५ लाखांची…

Read Full News

चोपडा : १२ वर्षीय मुलीवर शेतात अत्याचार करत दगडाने ठेचून खून, संतापजनक प्रकाराने खळबळ

हॅलो जनता, प्रतिनिधी – राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना चोपडा तालुक्यात शनिवारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. विरवाडे-मालापूर रस्त्यावर एका बारा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. तिच्या लहान बहिणीने हा प्रकार गावकऱ्यांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. शेतातील निंदणीचे काम आटोपून मालापूर…

Read Full News

राज्यातील अनेक अधिकारी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी चौकशीच्या रडारवर, दोन जिल्हाधिकाऱ्यांसह ४०० अधिकाऱ्यांची यादी…

हॅलो जनता, प्रतिनिधी – प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी (IAS) पूजा खेडकर हिचे बिंग फुटल्यानंतर सुरू झालेली चौकशी राज्यातील अनेक अधिकाऱ्यांना भोवण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या राज्यातील एक कृषी उपसंचालक बोगस दिव्यांग प्रमाणपत्र चौकशीच्या रडारवर आहे. याशिवाय, एका “आरटीओ”सह आणखी ३५९ सरकारी अधिकारी पूजा खेडकरच्याच धर्तीवर गोत्यात येण्याची शक्यता आहे. खेडकर प्रकरणानंतर राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र चौकशी सुरू…

Read Full News

चांगली विकास कामे केल्याने गावाने केली आमदारांची लाडू तुला, कुठे घडला हा प्रकार….

हॅलो जनता, प्रतिनिधी – लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने चांगली काम केली तर लोकप्रतिनिधींचे गावातील नागरिक खूप कौतुक करत असतात. असाच काहीसा प्रकार पाचोरा भडगाव मतदार संघातील वाणेगाव या गावात घडला आहे. आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा भडगाव मतदार संघात आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आणि मतदारांच्या भेटी घेण्यासाठी विकास दौरा हा कार्यक्रम हाती घेतला असून…

Read Full News

बांगलादेशात हिंदुंवर अत्याचार सुरूच, समोर आली धक्कादायक माहिती….

हॅलो जनता, प्रतिनिधी – बांग्लादेशात आताही हिंदुसह इतर अल्पसंख्याक समाजावर अत्याचार सुरू आहे. गेल्या काही दिवसांत बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूवर हल्ले होत असल्याचे दिसून आले. आता हल्ले आणि अत्याचाराचा सामना केल्यानंतर येथील हिंदूंना सरकारी नोकऱ्यांचा राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे. ५ ऑगस्टपासून जवळपास ५० हिंदू शिक्षणतज्ज्ञांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती बांगलादेश…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION