हॅलो शिक्षणहॅलो सामाजिक

ब. ज. हिरण विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची विभागीय वुशु स्पर्धेसाठी निवड.

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव 

कजगांव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वुशु स्पर्धेत ब. ज. हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

या स्पर्धेत विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी आपल्या-आपल्या वजन गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. यामध्ये १७ वर्षांखालील -५२ किलो वजन गटात अर्जुन नवनाथ भालेराव, -६० किलो वजन गटात कृष्णा नवनाथ भालेराव, तर १९ वर्षांखालील -५६ किलो वजन गटात पूनम गोरख भिल यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

याशिवाय विद्यालयाच्या प्रसाद महाजन, नंदिनी संदिप अहिरे व लीना विशाल सूर्यवंशी यांनी जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक, तर नंदिनी नितीन पाटील व धनश्री मनोज देसले यांनी तृतीय क्रमांक मिळवत विद्यालयाच्या यशात भर घातली.

या सर्व खेळाडूंना क्रीडाशिक्षक ए. के. राजपूत सर व श्रीमती एम. जे. पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बापुसो मंगेश सुमेरसिंग पाटील, सचिव ताईसो रत्नाताई भरतसिंग पाटील, उपाध्यक्ष जीभाऊसो दिनकरराव पाटील, संचालक तात्यासो स्वप्निल भरतसिंग पाटील, सहसचिव तात्यासो पंजाबराव देवकर, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक एस. एस. केदार सर, पर्यवेक्षक जी. टी. पाटील सर, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील नागरिकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विभागीय स्तरावर निवड झालेल्या अर्जुन भालेराव, कृष्णा भालेराव आणि पूनम भिल यांच्याकडून आता विभागीय स्पर्धेतही दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button