हॅलो सामाजिक

पत्रकारिता, ए आय आणि सकारात्मक मीडियावर राष्ट्रीय मंथन ; ब्रह्माकुमारीजतर्फे मीडिया महासंम्मेलन.

राष्ट्रीय मीडिया महासंम्मेलन – २०२६ : श्रेष्ठ विश्वनिर्मितीसाठी सशक्त मीडियाचे मंथन

जळगाव प्रतिनिधी : ९ ते १३ सप्टेंबर, २०२६ दरम्यान ब्रह्माकुमारीज मुख्यालय, आबू रोड येथे देशभरातील पत्रकार, मीडिया प्रतिनिधी व कंटेंट क्रिएटर्स सहभागी होणार

आबू रोड, राजस्थान : (बीके महामीडिया वृत्तसेवा) माहितीपासून अंतर्मन परिवर्तनाकडे वाटचाल घडविणाऱ्या माध्यमांच्या सकारात्मक भूमिकेला केंद्रस्थानी ठेवून राष्ट्रीय मीडिया महासम्मेलन-2026 चे आयोजन 9 ते 13 सप्टेंबर 2026 दरम्यान ब्रह्माकुमारीज मुख्यालय, मानसरोवर परिसर, आबू रोड (राजस्थान) येथे करण्यात आले आहे. या महासम्मेलनाची मुख्य संकल्पना “श्रेष्ठ विश्वनिर्मितीसाठी सशक्त मीडिया” अशी आहे.

देशभरातील पत्रकार, संपादक, न्यूज अँकर, डिजिटल मीडिया तज्ज्ञ, युट्यूबर्स, सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्स तसेच जनसंपर्क व प्रसारमाध्यम क्षेत्रातील मान्यवरांचा हा राष्ट्रीय संगम ठरणार आहे.
आयोजकांच्या माहितीनुसार, मीडिया ही समाजाला दिशा देणारी प्रभावी शक्ती आहे. जेव्हा माध्यमे आध्यात्मिक मूल्ये, नैतिकता, सत्य, संतुलन आणि समाधानकेंद्री दृष्टिकोन स्वीकारतात, तेव्हा समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते. या महासम्मेलनाचा उद्देश मीडियाच्या या सामर्थ्याला मानवकल्याणासाठी प्रेरित करणे हा आहे.

विशेष सत्रांचे आयोजन

पाच दिवसीय या महासम्मेलनात राजयोग ध्यान, व्यक्तिमत्व विकास, तणावरहित जीवनशैली, सकारात्मक पत्रकारिता, डिजिटल युगातील माध्यमांची भूमिका, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व मीडिया, जागतिक एकता, संवादकौशल्य, नेतृत्व विकास तसेच मूल्यनिष्ठ पत्रकारिता या विषयांवर विशेष सत्रे होणार आहेत.
दररोज सकाळी राजयोग ध्यान सत्र, शारीरिक व्यायाम, चिंतन सत्र, परिसंवाद, पॅनेल चर्चा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची झलक

10 सप्टेंबर रोजी उद्घाटन सत्रात श्रेष्ठ विश्वनिर्मितीसाठी सशक्त मीडिया या विषयावर मार्गदर्शन होईल.
11 सप्टेंबर रोजी “वन-टू-वन वार्ता” मालिकेत AI आणि मीडिया, मानवतेची आकाशगंगा, तसेच उत्तरदायी सोशल मीडिया या विषयांवर चर्चा होणार आहे.
समारोप सत्रात शांतीच्या युगाकडे सेवारूप मीडिया हा विशेष संदेश दिला जाईल. 12 सप्टेंबर रोजी सहभागींसाठी माउंट आबू दर्शन व आध्यात्मिक अनुभव सत्राचे आयोजन आहे.

मीडियाला मिळणार आध्यात्मिक स्पर्श
हे महासम्मेलन केवळ व्यावसायिक प्रशिक्षणापुरते मर्यादित नसून आत्मिक उन्नती, अंतःशक्ती जागरण आणि सेवाभावी मीडिया संस्कार घडविणारे व्यासपीठ ठरणार आहे. पत्रकारिता अधिक तणावरहित, निष्पक्ष, रचनात्मक आणि जनहितकारी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

ऑनलाईन नोंदणी सुरू

इच्छुक सहभागी आपल्या जवळच्या ब्रह्माकुमारी केंद्रामार्फत ऑनलाईन नोंदणी करू शकतात. नोंदणी विनामूल्य असून पूर्वनोंदणी अनिवार्य आहे.

सहभागाचे आवाहन

मीडिया विंगतर्फे पत्रकार, मीडिया विद्यार्थी, फ्रीलान्सर, ब्लॉगर, युट्यूबर्स, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स तसेच जनसंचार क्षेत्राशी संबंधित सर्वांनी या राष्ट्रीय महासम्मेलनात सहभागी होऊन सकारात्मक समाजनिर्मितीच्या अभियानात योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वरील संमेलनासाठी नोंदणी आवश्यक आहे. यासाठी नोंदणीशुल्क नाही, सहभाग कालावधीतील आवास निवास, जेवण आदि सुविधा ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे निशुल्क पुरविल्या जाणार आहेत. मात्र प्रवासाचे तिकीट सहभागीनी त्यांच्या खर्चाने स्वत: करावयाचे आहे. त्यासाठी कुठला प्रवासखर्च संस्थेतर्फे देय राहणार नाही. नोंदणी केवळ नजीकच्या ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रामार्फत होत असते. त्यासाठी आपल्या नजीकच्या ब्रह्माकुमारी विद्यालयास संपर्क साधावा असे आवाहन डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र राज्य संयोजक, मीडिया प्रभाग, माऊंट आबू यांनी केले आहे.

डॉ. सोमनाथ वडनेरे
राज्य संयोजक,
ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभाग, माऊंट आबू
www.bkmahamedia.com
www.youtube.com/@BkMahaMedia
dr.vadnere@gmail.com | 9850693705

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button