जळगाव जिल्हा न्यायालयात एटीएम सुविधेचे उद्घाटन; पक्षकार, वकील व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना गवई यांनी न्यायालय हे सर्वसामान्य पक्षकारांच्या न्यायप्राप्तीसाठी कार्यरत असते, त्यामुळे त्यांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. न्यायालय आणि वकील यांच्यात परस्पर सलोखा व समन्वय असणे न्यायव्यवस्थेच्या बळकटीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. न्यायालय परिसरात एटीएम सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम स्वागतार्ह व स्तुत्य असल्याचेही त्यांनी गौरवोद्गार काढले.
यानंतर त्यांनी जळगाव जिल्हा वकील संघाच्या कक्षाला भेट देऊन वकिलांना मार्गदर्शन केले. तसेच भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे अनावरण करून संविधानातील मूल्ये जपण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी, जिल्हा न्यायाधीश-१ एस. व्ही. खोंगल, जळगाव जिल्हा न्यायालयातील इतर न्यायाधीश, जळगाव जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सागर चित्रे, जिल्हा सरकारी वकील, महाराष्ट्र बँकेचे विभागीय व्यवस्थापक व शाखा व्यवस्थापक, वकील संघाचे पदाधिकारी, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यायालय परिसरात सुरू झालेल्या या नव्या एटीएम सुविधेमुळे पक्षकार, वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांची आर्थिक व्यवहारांची गैरसोय दूर होणार असून, या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले.



