हॅलो राजकारण

“माझे स्वप्नातले जळगाव” चित्रकला स्पर्धेत कु. राखी मेतकर हिचा प्रथम क्रमांकाने गौरव

जळगाव : येथे आयोजित करण्यात आलेल्या “माझे स्वप्नातले जळगाव” या विषयावरील चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पनाशक्ती आणि कलागुणांचे उत्कृष्ट दर्शन घडविले. विविध आकर्षक चित्रांमधून जळगाव शहराचे स्वप्नवत चित्र विद्यार्थ्यांनी रंगविले होते.

या स्पर्धेतील खुल्या गटामध्ये समाजातील विद्यार्थिनी कु. राखी मधुकर मेतकर हिने उत्कृष्ट चित्रकलेच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावत ₹२१००/- रोख पारितोषिक मिळविले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात जळगावच्या महापौर दिपमाला काळे यांच्या हस्ते कु. राखी मेतकर हिचा ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आर्या सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अजित नांदेडकर, हॉटेल रिगल पॅलेसचे संचालक विनोद चौधरी तसेच दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक प्रदीप राजपूत उपस्थित होते. हा कार्यक्रम हॉटेल रिगल पॅलेस येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

समस्त सुतार समाज तसेच , जळगाव यांच्या वतीने कु. राखी मधुकर मेतकर हिचे स्पर्धेत सहभाग घेऊन प्रथम पारितोषिक मिळवल्याबद्दल अभिनंदन करण्यात येत असून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button