हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) – शेतकरी कर्जमाफी, शेतमजूर, दिव्यांग व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज पाचोरा तालुक्यातील बिल्दी फाटा येथे जळगाव – पाचोरा महामार्गावर चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
महत्वाचा व्हिडिओ –
या आंदोलनात प्रमुख मागण्या म्हणून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी त्वरित मिळावी, शेतमजूरांना योग्य रोजगार व वेतन मिळावे, दिव्यांगांना नियमित सवलती व शासकीय योजनांचा लाभ मिळावा, तसेच कामगारांसाठी कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशा विविध मुद्द्यांचा समावेश होता.
प्रहारच्या आंदोलनात यांचा होता सहभाग…
प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष आकाश चित्ते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन यशस्वीरीत्या पार पडले. त्यांच्या सोबत गुलाब नाना पाटील, निळकंठ पाटील सर, जनक पाटील, नाना हिरे, उमेश सर, पप्पू गायकवाड, विलास चव्हाण, किरण पाटील, विकास राजपूत, श्रीहरी शेजुळ, राजेंद्र पाटील, वाल्मीक सोनवणे, नाना पाटील, नईम कहाकर, अशपाक कहाकर, अण्णा वेंडर यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रहार आंदोलन, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी…
चक्काजाम दरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलकांची भेट नायब तहसीलदारांशी घेण्यात आली आणि सर्व मागण्यांचे निवेदन त्यांच्यामार्फत शासनाकडे सादर करण्यात आले. शासनाने तात्काळ शेतकरी कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा लवकरच अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आंदोलकांनी शांततेत आंदोलन संपवून महामार्ग वाहतूक सुरळीत करण्यात मदत केली.
इतर महत्वाच्या बातम्या…
शाळेत शिकवणार भगवद्गीता, ‘ या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय…
💥 ब्रेकिंग : आता पत्नीकडे फोन, बँकेचे पासवर्ड मागणे हा गुन्हा, उच्च न्यायालयाचा निर्णय
💥 ब्रेकिंग : पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांचा जळगावात भव्य नागरी सत्कार..
