Santosh Deshmukh : “बीड सरपंच हत्या प्रकरणी मोठा खुलासा: मुख्य आरोपींना घेतले ताब्यात !
हॅलो जनता, न्यूज : बीड
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची ९ डिसेंबर रोजी झालेली हत्या अजूनही चर्चेचा विषय बनली आहे. हत्येच्या घटनेला २५ दिवस उलटून गेल्यानंतरही मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले नव्हते. मात्र, आज सकाळी मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे.
हत्या केल्यानंतर या तिघा आरोपींनी फरार होण्याचा प्रयत्न केला होता. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या तिघांना फरार घोषित करण्यात आले होते आणि त्यांच्या शोधासाठी सीआयडीने प्रसिद्धीपत्रक जारी केले होते.
Santosh Deshmukh : संभाजी वायभसेंनाही पोलिसांनी घेतले ताब्यात
आज सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली असून, आरोपींना लवकरच न्यायालयात हजर केले जाईल. याशिवाय, आरोपींना मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायभसेंनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डॉ. वायभसे यांनी आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली असल्याची माहिती समोर आली आहे. तर, तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे आणि त्याचा शोध सुरू आहे.
Santosh Deshmukh Case : मी राजीनामा देण्याची गरज नाही – धनंजय मुंडे
Santosh Deshmukh : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्येची गुऱ्हाळ; तपासासाठी स्थापन केली एसआयटी
Jalgaon MIDC : चटई कंपनीला लागलेल्या आगीत 100 टनापेक्षा जास्त प्लास्टिक साहित्य खाक