Jalgaon : जळगावमध्ये हळदीच्या कार्यक्रमात बंदुकीचा थरार! आरोपीला नागरिकांनी पकडले
हॅलो जनता न्युज, जळगाव :
जळगाव (Jalgaon) शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरात राजाराम हॉलमधील हळदीच्या कार्यक्रमात एकाने बंदूक दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याच्याकडे गावठी कट्टा आढळून आला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २२ डिसेंबर रोजी रात्री जळगाव (Jalgaon) शहर पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना इंद्रप्रस्थ नगरात राजाराम नगर मंगल कार्यालयाबाहेर वाद सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर गर्दीत एका तरुणाला मारहाण होत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्या तरुणाला वाचवले आणि त्याचे नाव अतुल बजरंग तांबे (वय ३१, रा. राजगुरू नगर, पुणे) असल्याचे समजले. त्याच्यासोबत आणखी दोन व्यक्ती असल्याची माहितीही मिळाली.
गावठी कट्टा जप्त
घटनेची माहिती पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना देण्यात आली. सहाय्यक निरीक्षक रामचंद्र शिखरे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून तपास केला. आरोपी अतुल तांबे याच्याकडे असलेल्या बॅगेत गावठी कट्टा आढळून आला. त्याने पळून गेलेल्या साथीदारांची माहिती दिली, ज्यांपैकी एकाचे नाव माया असून दुसऱ्याचे नाव माहिती नसल्याचे त्याने सांगितले.
गुन्हा दाखल
हवालदार उमेश भांडारकर यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अतुल तांबे, माया आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक करत आहेत.
Bogus companies : महाराष्ट्र बोगस कंपन्यांमध्ये आघाडीवर तर दिल्ली दुसऱ्या स्थानावर