विधानसभा २०२४हॅलो राजकारण
आमदार किशोर पाटील यांना मंत्री पद द्यावे, युवासेनेच्या जिल्हाप्रमुखाची एकनाथ शिंदेकडे मागणी
हॅलो जनता न्युज, पाचोरा…
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवणारे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना राज्य मंत्रीपद मिळावे अशी मागणी जळगाव जिल्हा युवा सेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आलेली आहे.
तसे पत्र देखील युवा सेनेचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले असून आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होवू घातल्या असून यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि पक्षाला चांगला विजय मिळविण्यासाठी आमदार किशोर पाटील यांना राज्य मंत्री पद द्यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, जमीन मोजणीच्या शुल्कात वाढ….