Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट…
हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांची भेट घेतली असून विविध विषयांवर चर्चा केली आहे. 27 सप्टेंबर रोजी अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी जिल्हा च्या दौऱ्यावर येण्यासाठी विनंती केली. यावेळी जळगाव शहराचे उप महानगराध्यक्ष आशिष सपकाळे यांनी जळगाव मनसे मध्यवर्ती कार्यालय आंबेडकर मार्केट येथे सुरू करण्यात येणार असून, या कार्यालयाचे उद्घाटनासाठी त्यांचा वेळ मागितला.
यावेळी अमित ठाकरे लवकरच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यात जळगाव शहरात (Jalgaon) मनसे कार्यालयाचे उद्घाटन व तसेच भुसावळ शहरात राहुल सोनटक्के यांच्या मनसे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन, अमित ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, तसेच जळगाव जिल्हा विधानसभा पक्षनिरीक्षक किशोर शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यावर असताना भेट घेतली. अमित ठाकरे यांना जळगाव जिल्हा दौऱ्यावर येण्याची निमंत्रण देण्यात आले व सोबत पाचोरा येथे जिल्हा मेळावा होणार असून त्यासाठी जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी विनंती केली.
त्याप्रसंगी सोबत ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे जळगाव (Jalgaon) शहर अध्यक्ष विनोद शिंदे जळगाव उपशहर अध्यक्ष आशिष सपकाळे जनहित विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ भुसावळ शहराध्यक्ष राहुल सोनटक्के तालुका सचिव अनिल दिघे आधी उपस्थित होते.
राजनंदिनी संस्थेतर्फे राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार सौ. कोकिळा पाटील यांना प्रदान