ब्रेकिंग : उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होतील
हॅलो जनता, प्रतिनिधी – देशातील चार महत्त्वाच्या राज्यांचा विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे राज्यात देखील विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये चुरशीची स्पर्धा पहायला मिळत आहे. दोन दिवसांपुर्वी मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट करा मग पाठिंबा देतो. याबरोबरच शनिवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असतील असा पुनरुच्चार केला आहे. संजय राऊत हे विदर्भाच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
2019 मध्येही उद्धव ठाकरे यांना सर्व संमतीने मुख्यमंत्री करण्यात आले होते. आता 2024 ची वेळ आहे. जागावाटप सुसंवादातून होईल आणि मविआचे सरकार येईल. मला विश्वास नव्हे खात्री आहे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील, जनतेच्या मनात तेच मुख्यमंत्री असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते खा संजय राऊत यांनी केले.
महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून गेले काही दिवस रस्सीखेच सुरू आहे. ज्या पक्षाच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री अशी भूमिका काँग्रेसने व्यक्त केली. यावर मला हे सूत्र मान्य नाही असे स्पष्ट करीत मुंबईत झालेल्या मविआच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढे करावा मी येथेच समर्थन देतो अशी भूमिका व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या आणि स्वतः शरद पवार इकडे विदर्भात असताना राऊत यांनी आता पुन्हा असे मत व्यक्त केल्याने नेमके आता शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस याला काय प्रत्युत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या…
ब्रेकिंग न्यूज : वैशाली सुर्यवंशी यांनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट
भडगाव तालुक्यातील शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, किशोर आप्पाची ताकद वाढली…