हॅलो राजकारण

Raver Loksabha : मंत्री गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची सभा

हॅलो जनता (जळगाव) | रावेर लोकसभा (Raver Loksabha) मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जामनेरला येणार असून मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात ते कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत.

२१ एप्रिलला जामनेर येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ २१ एप्रिलला शरद पवार यांच्या उपस्थितीत जामनेर येथील भागीरथी मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात श्री पवार महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.

मेळाव्यास महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रावेर तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शिवसेना उबाठा गट जामनेर तालुका प्रमुख ऍड ज्ञानेश्वर बोरसे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जामनेर तालुकाध्यक्ष शंकर राजपूत यांनी केले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon loksabha : ब्रेकींग न्युज: जळगाव जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सूरवात मात्र हा नवीन नियम बंधनकारक…

Jalgaon loksabha: मंत्री गिरीश महाजन यांनी राजकीय सन्यास घ्यावा – माजी खासदार उन्मेष पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button