हॅलो राजकारण

Ajeet Pawar : विधानसभा निवडणुकीत ठरलं, हा आहे अजित पवार गटाचा “मेगा प्लॅन”

हॅलो जनता, प्रतिनिधी – उपमुख्यमंत्री मंत्री अजित (Ajeet Pawar) पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु केली असून त्यासाठी येत्या ८ ऑगस्टपासून राज्यात जनसन्मान यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचा प्रारंभ नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरीतून  होईल. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा या यात्रेचा पहिला टप्पा ३१ ऑगस्टला संपणार आहे.

अजित पवार (Ajeet Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत जनसन्मान यात्रेची माहिती दिली. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली निघणारी ही ‘जनसन्मान यात्रा’ संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे. ‘जनसन्मान’ यात्रेत समाजातील सर्व घटकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. ही यात्रा योजनांपुरती सिमीत न राहता समाज घटकांना काय अपेक्षित आहे. त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, त्याही अजित पवार जाणून घेणार आहेत, असेही तटकरे यांनी सांगितले.

तसेच या यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन सभा किंवा कार्यक्रम घेणार आहोत. महिला, युवक, शेतकरी, आदिवासी आणि उपेक्षित घटकांशी अजित पवार (Ajeet Pawar) संवाद करतील. या संवादात त्यांच्या मनातील भावना समजून घेत सरकारच्या यंत्रणांमार्फत अधिक प्रभावीपणे योजना पोचवण्याचा प्रयत्न राहणार आहे. संघटना म्हणून पूर्ण ताकदीने, क्षमतेने जनसन्मान यात्रेत सहभागी होणार आहे, असेही तटकरे म्हणाले.

उत्तर महाराष्ट्रानंतर येत्या १५ ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्रातून यात्रेची सुरूवात होईल. ती २२ ऑगस्टपर्यंत मुंबईत येईल. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी विदर्भातून यात्रेला सुरुवात होईल. पहिल्यांदा सलग पाच दिवसाचा दौरा आहे. ही यात्रा दिंडोरी, देवळाली, निफाड, येवला, सिन्नर, अहिल्यानगरमधील कोपरगाव, चांदवड, कळवण, धुळे शहर, अमळनेर, मालेगाव (मध्य) या विधानसभा मतदारसंघात जाणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Birth- Death Certificate : सर्व्हर डाऊन मुळे जन्म मृत्यूच्या दाखल्यांसाठी नातेवाईकांच्या हेलपाट्या

Pachora : तात्काळ ट्रांसफार्मर सुरू करा अन्यथा…. पाचोर्‍यात उद्धव सेना आक्रमक…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button