शकुंतला जे. प्राथमिक विद्यालयात हस्ताक्षर कार्यशाळा उत्साहात संपन्न

जळगाव (प्रतिनिधी) दि. २ सप्टेंबर : शकुंतला जे. प्राथमिक विद्यालयात हस्ताक्षर कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. ही कार्यशाळा दिनांक ३० ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी घेण्यात आली असून कार्यशाळेत मार्गदर्शन सुप्रसिद्ध लेखन प्रशिक्षक जिग्ना मेहत यांनी केले.
एकूण ६० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हस्ताक्षर सुधारणा हा केवळ शैक्षणिक विषय नसून तो एक कला आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना या कार्यशाळेतून झाली. कार्यशाळा खेळकर आणि आनंददायी वातावरणात झाल्याने विद्यार्थ्यांनी अक्षरलेखन शिकताना मनसोक्त आनंद लुटला.
जिग्ना मेहता यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक लक्ष देऊन हस्ताक्षर सुधारण्याच्या विविध पद्धती शिकवल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य अक्षरांची रचना, अंतर ठेवणे, लेखनात गती व सौंदर्य साधणे याबाबत मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे, या कार्यशाळेत शिक्षकांनाही नवनवीन तंत्र आत्मसात करण्याची संधी मिळाली.

कार्यशाळेत ध्यान व ओंकार सत्र घेण्यात आले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आत्मशांती, एकाग्रता व मानसिक स्थैर्य लाभले. कार्यशाळा संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी जिग्ना मेहता यांच्याशी आत्मीय संवाद साधत आपले अनुभव शेअर केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या उपस्थितीत पार पडलेली ही कार्यशाळा अत्यंत यशस्वी ठरली. विद्यालय प्रशासन व शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात अशा कार्यशाळा नियमितपणे आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.
इतर महत्वाच्या बातम्या….
💥 Maratha Arakshan : ईडब्ल्यूएस हेच मराठ्यांसाठी योग्य आरक्षण आहे, भाजपच्या मंत्र्याचे वक्तव्य…
💥विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र प्रशाळेतील विद्यार्थिनी नेहा मालपुरे सेट परीक्षा उत्तीर्ण