सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ, चांदीची ७०० ने तर, सोन्यात ४०० रुपयांनी भाववाढ
हॅलो जनता, जळगाव – चांदीच्या भावातील चढ- उतार सुरूच असून आज त्यात, ७०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे त्यामुळे चांदी ८९ हजार २०० रुपये प्रती किलोवर पोहचली आहे. सोन्याच्याही भावात ४०० रुपयांची वाढ होऊन ते ७२ हजार ४०० रुपये प्रती तोळ्यावर पोहचले आहे.
गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या भावात सतत चढ-उतार होत आहे. त्यात शुक्रवार, १४ जून रोजी ८०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी ८८ हजार ५०० रुपये प्रती किलोवर आली होती. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मात्र चांदीत ७०० रुपयांची वाढ होऊन ती ८९ हजार २०० रुपयांवर पोहचली. तीन दिवस स्थिर असलेल्या सोन्याच्या भावात आज ४०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ७२ हजार ४०० रुपये प्रती तोळ्यावर पोहचले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या…
जागतिक रक्तदान दिनानिमित्त रेड प्लस ब्लड बँक येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
भुसावळ येथील अभाविप कार्यक्रमास डॉ. केतकी पाटील यांनी दिली भेट….
Kharif Hangam : रावेर तालुक्यात कापूस पिकाचे क्षेत्र घटणार, “हे” आहे कारण…..