यावल शहर हादरले – सहा वर्षीय मुलाचा दुष्कर्मानंतर खून, मृतदेह पोत्यात आढळला

हॅलो जनता न्यूज, यावल (प्रतिनिधी) : यावल शहरातील बाबुजीपुरा भागात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षक मजीद खान यांचा सहा वर्षीय मुलगा ५ सप्टेंबर रोजी इदच्या दिवशी सायंकाळपासून बेपत्ता झाला होता. मुलगा हरवल्याचे लक्षात येताच कुटुंबियांसह नातेवाईकांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली. सोशल मीडियावर त्याचा फोटो व्हायरल करून जनतेची मदत घेण्यात आली. मात्र मुलगा कुठेही सापडला नाही.
यावल हादरले : पोलिसांचा शोध अन् सापडला मृतदेह..
दरम्यान, दुसऱ्या दिवशीच या बेपत्ता बालकाचा मृतदेह शेजारी राहणारे बिस्मिल्ला खलीफा दस्तगीर यांच्या दुमजली घराच्या वरच्या मजल्यावरील कोठीत पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला. ही माहिती समजताच शहरात खळबळ उडाली.

घटनास्थळी डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह पोलीस पथक तातडीने दाखल झाले. प्राथमिक तपासात मुलावर दुष्कर्म करून त्याचा खून करण्यात आल्याची शक्यता पुढे आली आहे. गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी मृतदेह लपवून ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावल हादरले : संशयित आरोपीने केली पोलिसांची दिशाभूल..
विशेष म्हणजे, या घटनेतील संशयित आरोपींनी मुलगा हरवल्याच्या शोधमोहीमेत सहभागी होऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला असल्याचे तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
या घटनेमुळे यावल शहरात तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. बालकाच्या दुर्दैवी मृत्यूने परिसर शोकाकुल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
अवैध वाळू वाहतूक : डंपरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू; चालक पोलिसांच्या ताब्यात
💥 ब्रेकिंग : ११ वर्षात पहिल्यांदा डाग लागला, उद्घाटन कार्यक्रमात आमदारांनी व्यक्त केली खंत…
💥 ब्रेकिंग : पाचोऱ्यात ठाकरेंची सेना डॅमेज कंट्रोल करणार, आगामी निवडणुकांची रणनीती ठरली….