🚨 ब्रेकिंग: देशाचे नाक कापणाऱ्या काँग्रेसचा जाहीर निषेध, देशाची माफी मागावी – जितेंद्र जैन..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा — देशात तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयक भारताची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या India AI Impact Summit दरम्यान राजधानीतील भारत मंडपम येथे गोंधळाची घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर Indian Youth Congress च्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून कार्यक्रमात व्यत्यय आणल्याचा दावा करण्यात येत असून, या प्रकारावर शिवसेना आणि युवासेनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले की, “भारत जागतिक पातळीवर तंत्रवैभव सादर करत असताना अशा प्रकारचा गोंधळ घालणे हे देशहिताला बाधा आणणारे आहे. विरोध असणे हा लोकशाही हक्क आहे; मात्र तो सैद्धांतिक आणि शांततामय पद्धतीने मांडला गेला पाहिजे. विदेशी पाहुण्यांसमोर देशाची प्रतिमा मलिन होईल, अशा कृती टाळल्या पाहिजेत.”
जितेंद्र जैन पुढे म्हणाले की, भारत-अमेरिका कराराबाबत मतभेद असतील तर काँग्रेसने त्यांची कारणे जनतेसमोर मांडावीत. परंतु कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी व गोंधळ घालणे हा योग्य मार्ग नाही. या घटनेबाबत काँग्रेस आणि संबंधित नेत्यांनी देशातील जनतेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या…




