केसीई सोसायटीची ८१ वर्षांची शैक्षणिक परंपरा, गौरव सोहळ्याचे भव्य आयोजन…

हॅलो जनता न्यूज, जळगाव (प्रतिनिधी) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी (KCE) या जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थेच्या स्थापना दिनाचा भव्य सोहळा दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.४५ वाजता संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. “ज्ञान प्रसारो व्रतम” हे ब्रीदवाक्य घेऊन १९४४ साली स्थापन झालेल्या या संस्थेला ८१ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण झाली आहे.
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी अशी आहे वाटचाल
सुरुवातीला विद्या प्रसारक संस्थेच्या वास्तूत (१९४४ ते १९४९) कार्यरत असलेली ही संस्था, दानशूर मूळजी जेठा यांनी दिलेल्या जागेत स्थिरावली. गेल्या काही वर्षांत आयएमआर, अभियांत्रिकी महाविद्यालय, लाँ कॉलेज, मुलांचे वसतिगृह आणि अत्याधुनिक ५०० प्रेक्षक क्षमता असलेले नाट्यगृह उभारून संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित केले आहेत.

राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP-2020) अंतर्गत केसीई सोसायटी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान, कला, वाणिज्य, भारतीय ज्ञान प्रणाली (IKS), भारतीय संगीत, रिफ्लेक्सोलॉजी, निसर्गोपचार व योग विज्ञान अशा विविध शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर व डॉक्टरेट अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहे.
गौरव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…
या सोहळ्यात प्रथमच केसीईच्या सर्व संस्था एकत्र येऊन १७ वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून संस्थेची ऐतिहासिक वाटचाल, कार्य आणि यशोगाथा सादर करणार आहेत. संस्थेच्या कार्याचा परिचय देणारी विशेष चित्रफीतही यावेळी प्रदर्शित केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. विजय माहेश्वरी प्रमुख अतिथी तर उपकुलगुरू एस. टी. इंगळे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केसीई सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील भूषवणार आहेत.
या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील, डी. टी. पाटील, प्रा. मृणालिनी फडणवीस, शशिकांत वडोदकर व प्राचार्य संजय भारंबे यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची माहिती दिली.
इतर महत्वाच्या बातम्या….
🛑 ब्रेकिंग : नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसवर हल्ला; आठ जण जखमी
जळगाव मयुरीच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, कुटुंबियांचा धक्कादायक आरोप…
🛑 ब्रेकिंग: महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची या नेत्याकडे, राजकीय चर्चांना उधाण..