पाचोऱ्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक, विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

हॅलो जनता, (गजानन गिरी) पाचोरा –
पाचोरा तालुका कॉग्रेस तर्फे आज दि ३ रोजी भाजपा सरकार ने दिलेले आश्वासन पूर्ण करावे या मागणीसाठी काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे. या आंदोलनात भाजपने जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा या पिकांची शासनाने खरेदी करावी खुल्या बाजारात कमी किंमतीत विकलेल्या सोयाबीन, कापूस, तूर हरभरा या पिकाला भावांतर योजना जाहीर करा.
शेतकऱ्यांना लागणारे खते बी बियाणे कीटकनाशके व अवजारे यांना जी एस टी मुक्त करावे, पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी सह इतर आणि शहरातील ग्राहकांना वीज मंडळाने स्मार्ट मीटर चे नावाखाली जे मीटर बसत आहे, ते तात्काळ बंद करावे अशा मागण्यांसाठी पाचोरा काँग्रेसने पाचोरा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या….
चौकशीतील दिरंगाई चोपडा पोलिसांच्या अंगाशी, नेमका काय आहे प्रकार…
तीन दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक, रेल्वेच्या वाहतुकीवर “असा” होईल परिणाम…
गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन