विधानसभा २०२४हॅलो राजकारण
मोठी बातमी : पाचोरा भडगाव मतदार संघातून ठाकरेंच्या सेनेंचा उमेदवार फायनल, यांना मिळणार उमेदवारी..
हॅलो जनता, प्रतिनिधी (पाचोरा)
आज ठाकरेंच्या सेनेचे नेते संजय राऊत जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृहात जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार यांच्या खासदार संजय राऊत यांनी चर्चा केली.
प्रत्येक मतदारसंघांमध्ये दोन ते तीन उमेदवार हे इच्छुक आहेत मात्र पाचोरा भडगाव मतदार संघातून एकमेव वैशाली सूर्यवंशी यांनी उमेदवारी मागितल्याने त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. पाचोरा भडगाव मतदारसंघातून वैशाली सूर्यवंशी यांच्या उमेदवारी वर बैठकीत सर्वांचे एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे.
पाचोरा भडगाव भाऊ विरुद्ध बहीण लढत रंगणार…
शिवसेनेत भूकंप झाल्यानंतर पाचोरा भडगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले मात्र वैशाली सूर्यवंशी यांनी आपले वडील दिवंगत माजी आमदार तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांचा वारसा चालविण्याचे ठरवत उध्दव ठाकरे सोबत राहण्याचे पसंत केले. त्यानंतर झालेल्या सभेत उध्दव ठाकरे यांनी पाचोरा भडगाव मतदार संघातून वैशाली सूर्यवंशी याच उमेदवार असतील असे वर्षभरापूर्वी जाहीर केले होते. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून वैशाली सूर्यवंशी पाचोरा भडगाव मतदार संघात काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून पाचोरा भडगाव मतदारसंघातून माजी आमदार दिलीप वाघ हे इच्छुक आहेत. तर दुसरीकडे मात्र वैशाली सूर्यवंशी यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाल्याचा पाहिला मिळत आहे. त्यामुळे आता वरिष्ठ पातळीवर शेवटी काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
इतर महत्वाच्या बातम्या…