जागतिक रक्तदान दिनानिमित्त रेड प्लस ब्लड बँक येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
हॅलो जनता (जळगाव) – आज जागतिक रक्तदान दिनानिमित्त रेड प्लस ब्लड बँक येथे रक्तदान शिबिर व हिमोग्लोबिन टेस्टिंग तसेच मोफत रक्तगट तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात रेड प्लस ब्लड सेंटरचे डॉ. गुणवंत भोळे यांनी तरुणांना रक्तदानाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले.
सदर रक्तदान शिबिरात ध्येयपूर्ती अभ्यासिका येथील तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन रक्तदान करुण प्रेरणादायी संदेश तरुणांना दिला आहे. रक्तसंकलनासाठी रेड प्लस ब्लड बँकेचे रवींद्र पाटील, विरेंद्र बिऱ्हाडे, रितेश जोशी यांच्यासह सर्व कर्मचारी वृंद यांनी कठिण परिश्रम घेतले.
इतर महत्त्वाच्या बातम्या..
भुसावळ येथील अभाविप कार्यक्रमास डॉ. केतकी पाटील यांनी दिली भेट….
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, असे आहे नियोजन…
Kharif Hangam : रावेर तालुक्यात कापूस पिकाचे क्षेत्र घटणार, “हे” आहे कारण…..