जागतिक रक्तदान दिनानिमित्त रेड प्लस ब्लड बँक येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
हॅलो जनता (जळगाव) – आज जागतिक रक्तदान दिनानिमित्त रेड प्लस ब्लड बँक येथे रक्तदान शिबिर व हिमोग्लोबिन टेस्टिंग तसेच मोफत रक्तगट तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात रेड प्लस ब्लड सेंटरचे डॉ. गुणवंत भोळे यांनी तरुणांना रक्तदानाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले. सदर रक्तदान शिबिरात ध्येयपूर्ती अभ्यासिका येथील तरुणांनी मोठ्या प्रमाणात…
