हॅलो राजकारण

जळगाव मनपा : प्रभाग क्रमांक ७ मधून महेश वर्मा यांच्या उमेदवारीची जनतेतून मागणी…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील महेश लक्ष्मीनारायण वर्मा हे एक सुशिक्षित, तडफदार आणि सर्वसामान्य जनतेशी थेट नाळ जोडून काम करणारे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत. सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय तसेच पर्यावरणीय क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य नागरिकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

कोरोना महामारीच्या भीषण काळात श्री. वर्मा यांनी दाखवलेली तत्परता आणि सामाजिक भान आजही अनेकांच्या स्मरणात आहे. लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या नागरिकांसाठी त्यांनी प्रशासनाशी समन्वय साधत तातडीची मदतकार्य राबवली. जळगाव येथून पश्चिम बंगालमधील निर्वासित मजुरांसाठी दोन विशेष रेल्वे सोडण्याच्या कामात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कलेक्टर कार्यालयाच्या माध्यमातून तसेच आमदार राजू मामा यांच्या सहकार्याने ही प्रक्रिया यशस्वी करण्यात आली. याचबरोबर भुसावळ येथूनही दोन रेल्वे सोडण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

या संपूर्ण प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनाचे सचिव तसेच पश्चिम बंगाल शासनाचे सचिव यांच्याशी त्यांनी थेट ट्विटर आणि ई-मेलद्वारे संपर्क साधून आवश्यक व्यवस्था करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शेकडो कुटुंबांना आपल्या घरी सुरक्षित परतता आले. एलआयसी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांचा अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क आला असून प्रशासनाची कार्यपद्धती, निर्णय प्रक्रिया आणि लोकहितासाठी काम कसे करता येते याची त्यांना सखोल जाण आहे. याच अनुभवाच्या जोरावर समाजातील सर्व घटकांचा आवाज बनून काम करण्याची क्षमता त्यांनी सिद्ध केली आहे.

विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये उमेदवारी करून त्यांनी आपली स्पष्ट, लोकाभिमुख आणि विकासात्मक भूमिका जनतेसमोर मांडली. पारदर्शक प्रशासन, नियोजनबद्ध विकास आणि सर्वसमावेशक प्रगती हे त्यांच्या विचारांचे मुख्य सूत्र आहे. प्रभाग क्रमांक ७ मधील युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विविध सामाजिक घटकांमध्ये महेश वर्मा हे एक सुपरिचित व्यक्तिमत्त्व आहेत. लोकांच्या मनात नव्या आशेचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून परिवर्तनासाठी आवश्यक असलेली बुद्धिमत्ता, व्यवस्थापन कौशल्य आणि नियोजनबद्ध दृष्टिकोन त्यांच्या कार्यातून दिसून येतो.

प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची तयारी असलेले महेश वर्मा हे आज प्रभाग क्रमांक ७ मधील उदयोन्मुख आणि विश्वासार्ह युवा नेतृत्व म्हणून पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग क्रमांक ४ मध्ये अश्फाक खाटीक यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा

ब्रेकिंग : युती निश्चित पण महायुतीचे काय? मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने महायुती संदर्भात संभ्रम

भडगाव तालुक्यातील राजकारणाचे चाणक्य – युवराज आबा पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button