कृषि विज्ञान केंद्रात चार दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण संपन्न, विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद
हॅलो जनता न्युज, जळगाव
कृषी विज्ञान केंद्र,ममुराबाद फार्म,जळगाव येथे “पिक संरक्षण उपकरणे,निवड, वापर व देखरेख” या विषयावर ग्रामीण युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण दिनांक ४ ते ७ डिसेंबर २०२४ या कालावधीत निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आंले होते.या प्रशिक्षणासाठी जळगाव जिल्ह्यातील १५ ग्रामीण युवक उपस्थित होते. या प्रशिक्षणात विविध पीकसंरक्षण उपकरणे व त्यांची ओळख ,फवारणी व धुरळणी यंत्रे, फवारणीसाठी वापरण्यात येणारी वेगवेगळ्या प्रकारची नोझल,मनुष्याचलीत पाठीवरील पम्प, ब्याटरीवर चालणारा पम्प,इंजिन चलित पम्प, एच.टी.पी. पम्प,इ पंपाची दुरुस्तीचे ज्ञान, जळगाव भागातील प्रमुख पिकावर येणाऱ्या किड व रोगांची ओळख,इ. या विषयावर विविध तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
हा कार्यक्रम संपन्न होत असताना कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ हेमंत बाहेती,निवृत्त प्रकल्प संचालक आत्मा जळगाव श्री अनिल भोकरे,संचालक केशवस्मृती प्रतिष्टान चे श्री दिलीप महाजन व श्री राहुल पवार, श्रिअदित्य सावळे,राजन इंगळे,विषय विशेषज्ञ इंजि वैभव सुर्यवंशी व डॉ शरद जाधव उपस्थित होते. या वेळी बोलताना प्रमुख पाहुणे श्री अनिल भोकरे म्हणाले कि ग्रामीण युवकांसाठी सदर प्रशिक्षण हे एक कौशल्य आत्मसात करण्याची सुवर्णसंधी आहे व प्रशिक्षनार्थिनी या संधीचे सोने करावे.कृषि विज्ञान केंद्र मार्फत राबविले जाणारे विविध कौशल्य प्रशिक्षांचा फायदा शेतकरी,महिला बचत गट,ग्रामीण युवक यांना होत असतो.त्यामुळे कृषि विज्ञान केंद्राच्या सतत सम्पर्कात राहून प्रगती साधावी, तसेच कृषीच्या ज्ञानाची पंढरी असलेले कृषि विज्ञान केंद्रयाचा फायदा करून घ्यावा.इथून जाताना मिळालेले ज्ञान घरातील पालक,मित्र,नातेवाईक यांच्यापुढे मांडावे.
यावेळी बोलताना श्री. दिलीप महाजन म्हणाले की, ग्रामीण युवकांना योग्य वेळी कौशल्य प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली व त्याचा फायदा प्रशिक्षणार्थीनी करून घ्यावा. नवनवीन कृषि आधारित उपक्रम कृषि विज्ञान केंद्र राबवीत असल्याचा अनाद व्यक्त केला. ग्रामीण युवकांनी कृषि क्षेत्रातील विविध कौशल्य संपदान करून प्रगती करावी असे प्रतिपादन केले.
यावेळी श्री राहुल पवार यांनी व्यवसायभिमुख ज्ञान आपणास याठिकाणी मिळाले त्याचा भविष्यात वापर करून उद्योजक बनावे, असे प्रतिपादन केले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.हेमंत बाहेती यांनी कौशल्य विकास, स्टार्टअप्स, अवजारे दुरुस्ती केंद्र, या संदर्भातील प्रशिक्षण व मार्गदर्शन कृषि विज्ञान केंद्रामार्फत शेतकरी,महिला बचत गट,ग्रामीण युवक यांना केले जाते.या प्रशिक्षणाचा ग्रामीण युवकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा व कौशल्य आत्मसात करावे.
यावेळी प्रशिक्षणार्थी म्हणून सार्थक निकुम, हर्षल महाजन, गणेश असवर,भावेश पाटील यांनी सदर प्रशिक्षणाचा आम्हा सर्वाना फायदा झाला,तसेच आवड निर्माण झाली व त्यामुळे कृषि क्षेत्रात शिक्षण अथवा उद्योजक बनण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या वेळी कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि वैभव सुर्यवंशी व सूत्रसंचालन डॉ. शरद जाधव यांनी केले.यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे विशाल भागवत हेही उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या….
प्रयागराज कुंभमेळ्याची तयारी पूर्ण, “या’ दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन…
मुख्यमंत्र्यांचे सचिव आयएएस श्रीकर परदेशी यांच्याबद्दल तुम्हाला ‘या” गोष्टी माहीत आहेत का?
“या” जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, डगाळ वातावरणासह येलो अलर्ट….