आमदारांबरोबर बौद्ध समाज बांधव साधणार संवाद, रविवारी पाचोर्यात भव्य संवाद मेळाव्याचे आयोजन
हॅलो जनता, प्रतिनिधी – आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘चला एक होऊया समाज हितासाठी लोकप्रतिनिधींशी संवाद साधूया’ या शीर्षकाखाली पाचोरा तालुक्यात प्रथमच बौद्ध समाज संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार संघातील अनेक गावातील प्रलंबित प्रश्न,वाड्या वत्यांमधील नागरी समस्या, घरकुल, रस्ते सामाजिक सभागृह, सभा मंडपे, शौचालय आदी विषयांची सोडवणूक व्हावी व दलित वस्ती भागात झालेल्या कामांची उजळणी व्हावी यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या समवेत बौद्ध समाजाचा संवाद मिळाव्याचे आयोजन केले असून या मेळाव्याला सिडकोचे अध्यक्ष तथा शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाठ हे उपस्थित राहणार आहेत. संजय शिरसाट यांची नुकतीच सिडकोच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या देखील सत्काराचे यावेळी आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील मोंढाळा रोड स्थित तुळजाई जिनिंगच्या प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमास पाचोरा तालुक्यातील तमाम बौद्ध उपासक उपासिका यांना आमंत्रित केले असून या ठिकाणी बांधव आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याशी संवाद साधणार असून आपल्या मागण्यांची मांडणी करणार आहेत. दरम्यान या मेळाव्याला पाचोरा तालुक्यातील बौद्ध समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पाचोरा तालुका बौद्ध समाज संवाद समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या….
माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी लावलेल्या बॅनर्स ने वेधले जळगावकरांचे लक्ष….