अमळनेर तालुक्यातील शिरुड गावाच्या उपसरपंच कल्याणी पाटील यांना मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण…
हॅलो जनता (अमळनेर) – तालुक्यातील शिरूड येथील उपसरपंच सौ. कल्याणी प्रफुल्ल पाटील यांना दिल्ली येथेआयोजीत नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदासह इतर मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. अमळनेर तालुक्यातील शिरुड या गावी कल्याणी पाटील यांनी जलसंधारण आणि गावाचा शस्वत विकास, हर घर तिरंगा मोहीम यासह इतर उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने राबविल्या मुळे २५ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात” या कार्यक्रमात कल्याणी पाटील यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला होता.
यावेळी कल्याणी पाटील यांनी केलेल्या कामाबद्दल नरेंद्र मोदी यांनी जाणून घेत त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच कल्याणी नावाप्रमाणे तुम्ही तुमच्या भागाचे कल्याण करा असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.
त्यांच्या या सर्व कामांची दखल घेत दिल्ली येथील पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथ विधी सोहळ्यासाठी त्यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. यासाठी पंतप्रधान कार्यालयातून दुरध्वनी वरून शपथविधी कार्यक्रम बाबत कळविण्यात असून कल्याणी पाटील यांच्यासह परिवाराला देखील आमंत्रित करण्यात आले होते.
दिल्ली येथे जावून घेतली माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची घेतली भेट
दिल्ली येथील राष्ट्रपती भवनातील शपथविधी सोहळा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी कल्याणी पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी शिरूड या गावातील राबवलेल्या उपक्रमाबद्दल ठाकूर यांनी माहिती जाणून घेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत…
इतर महत्त्वाच्या बातम्या…
जळगावात सामजिक कार्यकर्त्याचे अनोखे आंदोलन, खड्ड्यांना हार घालत केला मनपाचा निषेध
कृषी विभाग अलर्ट : जिल्ह्यात बियाणे विक्रेत्यांकडे कसून तपासणी, फत्तेपूरला सहा जणांना नोटिसा….
पाचोरा भडगाव मतदारसंघात आमदार किशोर पाटील ठरले किंगमेकर, विधानसभेच्या रंगीत तालमीत आप्पाची सरशी….