विजया केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालयात फळ वाटप
हॅलो जनता, जळगाव – येथील विजया केसरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा युवा उद्योजक अविनाश पाटील-जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सहकाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात जावून रुग्णांना फळ आणि बिस्कीट वाटप केले आहे. विजया केसरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा युवा उद्योजक अविनाश पाटील-जाधव यांच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात.
त्यात वृक्ष लागवड, रुग्णांना मदत यासह अन्य कार्यक्रम नेहमी राबवून समाज सेवेचा वसा त्यांनी अविरत सुरू ठेवला आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात तेथील रुग्ण आणि नातेवाईकांना विजया केसरी प्रतिष्ठान चे सहकारी मित्र परिवार तर्फे फळ आणि बिस्कीट वाटप करत अविनाश पाटील जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी स्वामी पाटील, विनोद पाटील , भोजराज पाटील आणि सहकारी उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या…
जामनेर मध्ये पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला अटक करत गुन्हा दखल….
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लवकरच पत्रकारांना न्याय मिळेल – आमदार किशोर पाटील