हॅलो राजकारण

पाचोरा भडगाव मतदारसंघात आमदार किशोर पाटील ठरले किंगमेकर, विधानसभेच्या रंगीत तालमीत आप्पाची सरशी….

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असून पाचोरा भडगाव मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या बालेकिल्ल्यात लोकसभेत चांगले मताधिक्य मिळवून आमदार किशोर पाटील पुन्हा एकदा किंग मेकर ठरले आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष यांनी विषम परिस्थितीत खिंड लढवत विजयश्री खेचून आणत चांगले मताधिक्य मिळवले आहे.

अत्यंत चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या स्मिता वाघ आणि ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार करण पवार यांच्यात चांगलीच लढत रंगली होती. ठाकरेंच्या सेनेकडून करण करण पवार यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मतदार संघात जणू एकतर्फी निवडणूक होते की काय? असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र महायुतीतर्फे आमदार किशोर पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, अमोल शिंदे, राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी प्रचार केला तर महाविकास आघाडीतर्फे उद्धवसेनेच्या वैशाली सूर्यवंशी यांच्यासह शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार, सचिन सोमवंशी यांनी चांगले काम केले. मात्र यात आमदार किशोर पाटील यांच्यावर जनतेने विश्वास ठेवत चांगले मताधिक्य महायुतीला मिळाले आहे.

विधानसभेची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीत संभाव्य उमेदवारांनी स्वतःचा प्रचार समजून मेहनत घेतल्याचे दिसून आले. मतदारसंघात शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमालाचे भाव, बेरोजगारी महागाई हे विषय गाजत असताना राममंदिर, विकासकामे, नरेंद्र मोदींचे खंबीर नेतृत्व आणि मतदार संघात आमदार किशोर पाटील यांनी लावलेल्या कामाचा धडाका यामुळे सत्ताधारी पक्षाला मतदान करून कौल दिल्याचे दिसून आले.

तसेच आमदार किशोर पाटील यांनी पाचोऱ्यात आयोजित केलेली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा स्मिता वाघ यांच्या विजयासाठी प्रभावी ठरली. उद्धवसेनेच्या वैशाली सूर्यवंशी यांनी जोमाने प्रचार केला. मात्र मतदारांनी महायुतीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. मतदारसंघात महाविकास आघाडीचे करण पवार यांनी प्रचार केला. मात्र प्रत्यक्ष मतदानातून भाजपच्या स्मिता वाघ यांनाच मतदारांनी पसंती दर्शविल्याचे निकालावरून दिसून आले. आमदार किशोर पाटील यांनी केलेले सूक्ष्म नियोजन आणि महायुतीत आपापसातले वाद विसरून साधलेला समन्वय याचा फायदा स्मिता वाघ यांना झाल्याचे पाहायला मिळाले.

जळगाव लोकसभा निवडणुक ही विधानसभेची रंगीत तालीम म्हणून ओळखली जात असून पाचोरा भडगाव मतदार संघातील जनतेने महायुती आणि आमदार किशोर पाटील यांच्याच बाजूने कौल दिल्याचे एकंदरीत पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत देखील जनता ही आमदार किशोर पाटील यांनी केलेल्या विकास कामे आणि त्यांचे नेतृत्व मान्य करेल असे चित्र मतदारसंघात निर्माण झाल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या..

BREAKING : केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांना मिळाला “या’ मंत्रालयाचा पदभार….

पाचोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतांची आमदार किशोर पाटील यांनी बांधावर जावून केली पाहणी, शेतकऱ्यांनी….

Gold Rate : एकाच दिवसात सोन्याच्या दरात चक्क एवढ्या रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे दर…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button